IND vs NZ – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलने दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे शतक आणि पहिले द्विशतक झळकावले आहे. त्याचबरोबर त्याने या मैदानावरील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या १७५ धावांना मागे टाकले आहे. शुभमनने अवघ्या १४९ चेंडूत ९ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने २०८ धावा फाटकावल्या.
#SarfrazKhan । डॉन ब्रॅडमनशी होत असलेल्या तुलनेवर स्वतः सरफराज खानची मोठी प्रतिक्रिया
शुभमन गिलच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून ३४९ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे आता पाहुण्या न्यूझीलंडला आता विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिलने त्याची मागील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील लय कायम न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार द्विशतक झळकावले.
#INDvsNZ । शाब्बास…! शुभमन गिलचे सलग दुसरे एकदिवसीय शतक; भारताचा स्कोर…
प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि शुभमनने चांगली सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी या दोघांनीही ६० धावा जोडल्या. त्यानंतर रोहित ३४ धावांवर बाद झाला. त्यांना पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील स्टार फलंदाज विराट कोहली अवघ्या ८ धावांवरच बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेला ईशान किशनही ५ धावा करून तंबूत परतला. मात्र, यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमनने भारताच्या डावाला सावरले. दोघांनी मिळून चौथ्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादव ३१ धावांवर असताना मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला.
𝟔.𝟔.𝟔.
𝐃𝐎𝐔𝐁𝐋𝐄 𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘 😱🤩😱
Take a bow, @ShubmanGill 💯💯#INDvNZ pic.twitter.com/wwvQslGTxb
— BCCI (@BCCI) January 18, 2023
हार्दिक पंड्याने सावध फलंदाजी करत शुभमन शुभमनने गिलला चांगली साथ दिली. २८ धावांवर असताना हार्दिक चुकीच्या पध्द्तीने बाद झाला. त्यानंतर सर्व जबाबदारी शुभमनच्या खांद्यावर आली. त्याने शेवटपर्यंत खेळपट्ट्टीवर टिकून राहत भारताची धावसंख्या ३४९ धावांवर पोहोचवली. पाहुण्या न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत डॅरिल मिशेल आणि हेन्री शिपले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला विजयी सुरुवात करण्याची चांगली संधी आहे. त्याचबरोबर मागील सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांना लोटांगण घ्यायला लावणाऱ्या मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
Innings Break!
A massive knock of 208 by @ShubmanGill as #TeamIndia post a formidable total of 349/8 on the board.
Scorecard – https://t.co/DXx5mqRguU #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/wMsuCcBfm5
— BCCI (@BCCI) January 18, 2023