नवी दिल्ली – भारतीय बॅडमिंटन संघटनेने आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह थॉमस-उबेर चषकातील बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या बॅडमिंटन संघाची घोषणा केली आहे. या संघात देशाची सर्वात गुणवान व नवोदित बॅडमिंटनपटू उन्नती हुडी हिची निवड करण्यात आली आहे.
राजधानीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे हा संघ निवडण्यात आला आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिच्यावर जास्त मदार असली तरीही उन्नतीने गेल्या मोसमापासून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे तिच्याकडूनही पदकाची अपेक्षा वाढली आहे. पुरुष गटात भरात असलेला लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत यांच्यावरच यश अवलंबून राहणार आहे.
भारतीय संघ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : पुरुष : लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, सात्विकसाइराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि बी. सुमीत रेड्डी.
महिला : पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, त्रिसा जॉली, गायत्री पी. व अश्विनी पोनप्पा.
आशियाई क्रीडा स्पर्धा व थॉमस-उबेर चषक : पुरुष : लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत, चिराग शेट्टी, सात्विकसाइराज रंकीरेड्डी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन, विष्णू वर्धन गौड, कृष्ण प्रसाद गारिगा.
महिला : पी. व्ही. सिंधू, आकर्षी कश्यप, अश्मित चलिहा, उन्नत्ती हुडा, त्रिसा जॉली, गायत्री पी, एन. सिक्की रेड्डी, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रॅस्ट्रो आणि श्रुती मिश्रा.