केंद्र सरकारकडून “आयुष्मान सहकार’

देशातल्या 52 रुग्णालयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध होणार

 

पुणे – सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकार “आयुष्मान सहकार’ योजना राबविणार आहे.

या योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशातल्या 52 रुग्णालयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोमवारी (दि.19) “आयुष्मान सहकार’ ही विशेष योजना जाहीर केली. यांतर्गत “एनसीडीसी’च्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशातल्या 52 रुग्णालयांमध्ये मिळून 5,000 खाटांची सुविधा आहे.

या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये गुंतवणूक करणे, तंत्रज्ञानाचा विनियोग करणे, मनुष्यबळ विकास करणे, वैद्यकीय बहुलतेला प्रोत्साहन देणे, सर्वांना परवडणारी आरोग्य सेवेत शेतकरी बांधवांना समाविष्ट करून घेणे, यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.