Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर आज मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले पंरतु,श्रीरामाच्या दर्शनासाठी लोकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली असल्याने मंदिरातील प्रवेश बंद करण्यात आला आहे. राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांना रोखण्यात आले. गर्भगृहात भाविकांची प्रचंड गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन झाले. तेव्हापासून भाविकांचा ओघ कायम आहे. मंगळवारी सकाळपासून लोक रांगेत उभे होते. मंगळवारी सकाळी 10-11 वाजेच्या सुमारास अचानक गर्दी वाढल्याने राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश वेळ लॉकर रुममध्येच जात आहे, जिथे लोकांना चप्पल, मोबाईल आणि इतर वस्तू ठेवाव्या लागतात. याशिवाय पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा लोकांना सतर्क करण्यासाठी सतत घोषणा करत आहेत. निमलष्करी दलाला घटनास्थळी पाचारण करून रस्ता मोकळा करण्यात येत आहे.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: Devotees gather in large numbers at Shri Ram temple on the first day after the Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/EGo9yr9sXS
— ANI (@ANI) January 23, 2024
एका वृत्तवाहिनीने सांगितल्याप्रमाणे, भाविकांनी राम दर्शनासाठी वाट पाहण्यात कोणतीही तक्रार नाही. जर आपण शांतपणे चाललो तर आपल्याला सहज प्रवेश मिळेल. दर्शन घेऊन परतलेल्या एका भाविकाने सांगितले की, मी हात जोडून सांगतो आहे की आत्ता इतक्या लांब जाऊ नका.
पोलिसांनी बंदोबस्त सुरू केला
मंदिरात जाण्यासाठी लांबच लांब रांग आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त करण्यात येत आहे.
सोमवारी श्री रामललाच्या नवीन मूर्तीच्या अभिषेक प्रसंगी संपूर्ण देशात धार्मिक उत्सव आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी देशातील विविध मंदिरांमध्ये भक्तांना प्रभू रामाला समर्पित गीते आणि विशेष भजने ऐकण्यात आली आणि विशेष प्रार्थनेचे आयोजनही करण्यात आले. याशिवाय ठिकठिकाणी भंडारा, रांगोळी आदी कार्यक्रमात सहभागी होऊन हनुमानाची पूजा केली.