अयोध्या – श्री राम मंदिरा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर अयोध्या जंक्शनचे नाव बदलून आता अयोध्या धाम असे करण्यात आले आहे. तेथील खासदार लल्लू सिंह यांनी आज ही माहिती दिली.
जनभावनांच्या अपेक्षेनुरूप नव्या रेल्वे स्थानकाची उभारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आता त्या स्थानकाचे अयोध्या धाम असे नामकरणही करण्यात आले आहे. याकरता त्यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.