मुंबई – ‘सैराट’ चित्रपटातून घरातघरात पोहचणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच रिंकूने एक पोस्ट इनस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिने तिच्या आयुष्यातील पहिल नाटक पाहिल्याचे सांगितले आहे. यावेळी तिने तिचा अनुभवही सांगितला आहे.
रिंकू राजगुरुने नाट्यगृहातील काही फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देत रिंकूने लिहिले की, “माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलं नाटक. अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे ‘देवबाभळी’. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन.” रिंकूने ‘देवबाभळी’ हे नाटक पहिल्यांदा नाट्यगृहात पाहिले आहे. यावेळी तिने या नाटकाचे कौतुकही केले आहे. ‘संगीत देवबाबळी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले असून या नाटकाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, लवकरच अभिनेत्री रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये रिंकूसह अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मोठं महत्त्व असल्याने या चित्रपटाकडून अनेकांना भरपूर अपेक्षा असणार आहे. एक नवा आणि वेगळा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. मात्र यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे.