फलटण (प्रतिनिधी) – फलटण 43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण विधानसभा संघ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा तसेच भारत निवडणूक आयोगामार्फत दिव्यांग मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबत माहिती होण्यासाठी उद्या (शुक्रवारी) दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता फलटण पंचायत समिती सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले फलटण यांनी केले आहे.
तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी निखिल मोरे तसेच एस. के. कुंभार, स्वीप नोडल ऑफिसर शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर, स्वीप पथक प्रमुख तसेच सहाय्यक अधिकारी सचिन जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .