ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने पाहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यावर वर्चस्व राखत चौथ्याच दिवशी पाकवर एक डाव आणि ५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Australia win!
Mitchell Starc snares the last wicket of Imran Khan as the hosts cruise to a comprehensive an-innings-and-five-run victory over Pakistan at The Gabba.#AUSvPAK SCORECARD 👇https://t.co/0d3zlDrR8C pic.twitter.com/nfEdJjDqS7
— ICC (@ICC) November 24, 2019
पाकिस्तानचा पहिला डाव २४० वर आटोपला होता. पाकिस्तानकडून पहिल्या डावात असद शफिफने सर्वाधिक ७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ तर पॅट कमिन्सने ३, हेझलवूडने ३ आणि लायनने १ गडी बाद केला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ५८० पर्यत मजल मारत ३४० धावांची मजबूत आघाडी घेतली. यामध्ये डेव्हिड वा़र्नरने १५४ आणि मार्नस लॅबश्चेनने १८५ धावांचे योगदान दिले. पाकचा दुसरा डाव ३३५ वर संपुष्टात आणला.
कालच्या ३ बाद ६४ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज पाकचा दुसरा डाव ८४.२ षटकांत सर्वबाद ३३५ वर संपुष्टात आला. दुस-या डावात जोश हेझलवूडने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्सने २ आणि नाथन लायनने १ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
तिस-या दिवसअखेरीस आस्ट्रेलियाने पाकच्या तीन फलंदाजाना माघारी धाडलं होतं.त्यानंतर चौथ्या दिवशी मात्र बाबर आझमने आणि मोहम्मद रिजवानने मैदानात काहीवेळ तग धरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आझमला नाथन लायनने टिम पेनकरवी १०४ धावांवर व मोहम्मद रिजवानला हेझलवूडने नाथन लायनकरवी ९५ धावांवर बाद करत संघाचा विजय सुकर केला. त्यानंतर यासिर शाह ४२ आणि शान मसूद ४२ यांना वगळता इतर फलंदाज झटपट माघारी परतले आणि आस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आल.