ऍडलेड – यजमान ऑस्ट्रेलियाने पाहुण्या वेस्ट इंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकत मालिका विजय साकार केला. ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही वर्चस्व राखले.
Australia seal the series 2-0 with a massive win 💥#WTC23 | #AUSvWI | | https://t.co/jfgb365Spl pic.twitter.com/o6QwzuFTpV
— ICC (@ICC) December 11, 2022
दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजवर तब्बल 419 धावांनी मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 511 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून मार्नस लेबुशेन व ड्रॅव्हिस हेड यांनी दीडशतकी खेळी केल्या.
त्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव 214 धावांवर संपवत मोठी आघाडी घेतली. त्यांना फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 6 बाद 199 धावांवर घोषित केला व वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 497 धावांचे मोठे आव्हान उभे केले.
यासमोर वेस्ट इंडीजचा डाव 41 व्या षटकांत अवघ्या 77 धावांवर संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, मायकल नेसेर व स्कॉट बोलॅंड यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. या सामन्यात दीडशतकी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा हेड सामन्याचा मानकरी ठरला. तर, मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचाच लेबुशेन मालिकेचा मानकरी ठरला.