औरंगाबाद : चिकलठाण येथी शासकीय रुग्णालयात (मिनी घाटी) नवे ६ कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तर सात जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून एका कोरोनाबाधितांचा आज दुपारी १२ वाजत मृत्यू झाल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.
दरम्यान, चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयात एकूण २१० रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज केलेल्या तपासणीमध्ये ३६ जणांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून,१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, तर आतापर्यत रुग्णालयातून १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.