पुणे – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे शहरातील हडपसर येथील सृजन हाऊस कार्यालयावर २-३ अज्ञातांनी शनिवारी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, कार्यालयात खाली उभे असलेल्या काही वस्तूंचे आणि वाहनाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या संदर्भात स्वतः आमदार रोहित पवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत. या घटनेसंदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यात तीन अत्रात व्यक्ती कार्यालयात जाताना दिसत आहे. मात्र, अद्याप ही जाळपोळ कोणी केली यासंदर्भात खुलासा झालेला नाही. तसेच रोहित पवार यांच्याकडून सुद्धा याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.