बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल याला डेट करत असल्याने चर्चेत आली आहे. मात्र, या दोघांनीही कथित रिलेशनशिपबाबत नकार दिला आहे. त्यानंतरही दोघेजण अनेक कार्यक्रमात एकत्रित दिसत असून काहीवेळा त्यांना डेट आणि डिनर करतानाही स्पॉट करण्यात आले आहे.
केएल राहुल आणि अथिया हे दोघेजण गेल्या काही काळापासून लव अफेयरमुळे सतत चर्चेत असतात. अनेकवेळा दोघेजण एकत्रित डिनर डेटवर पाहण्यात आले आहेत. तसेच अथिया-केएल राहुल सोबत असल्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. या फोटोत अथिया ब्लॅक ब्लेझर आणि व्हाईट क्रॉप टॉपमध्ये खूपच सुंदर अशी दिसते. तर केएल राहुल व्हाईट टी-शर्ट आणि डेनिम जॅकेटमध्ये एकदम कुल दिसतो.
या डिनरमध्ये सूरज पांचोली आणि आकांक्षा रंजनही झळकत आहेत. या डिनर पार्टीनंतर अथिया आणि राहुल एकाच कारमध्ये बसून जाताना दिसले. तसेच या दोघांचा रोमांसला डिझायनर विक्रम फडणीस याने दुजोरा दिल्याने दोघांचे प्रेम प्रकरण सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या नवीन कपलची सर्वत्र चर्चा रंगत आहे.