तरणतरण : पंजाबमध्ये शनिवारी तारणतारण जिल्ह्यात धार्मिक मिरवणुकीत झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात 14 जण ठार झाले. तर अपघातात 20 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पंजाब पोलिसांनी घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले कि, नगर किर्तन (धार्मिक मिरवणूक) दरम्यान हे फटाके ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून आणले जात होते, यावेळी हा स्फोट झाला असून यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)