नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पक्रिया पार पडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीत फक्त ५५ टक्के मतदान नोंदवण्यात आले. २०१५ साली झालेल्या मतदानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांनी मतदान कमी झाले. या निवडणुकीचा निकाल ११ तारखेला जाहीर होणार आहे.
#DelhiElections2020: 54.65% voter turnout in Delhi assembly polls till 6 pm. https://t.co/ppJy2iKaw5
— ANI (@ANI) February 8, 2020
यावेळी झालेल्या मतदानामध्ये दिल्लीकरांनी पाठ फिरवली. सकाळच्या सत्रात झालेले मतदान फारच कमी होते. मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान ५५ टक्क्यांपर्यंत पोहचले.
२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. ‘आप’ला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. दिल्ली गेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.