आळंदी – आळंदी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक बबन सटवाजी डोईफोडे नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. मंगळवारी (दि. 31) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या दालनात त्यांचा निरोप समारंभ झाला. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेला असाल तरी सुद्धा पोलीस विभागासाठी आणि समाजासाठी आपण कार्य करावे, असे पोलीस आयुक्त चौबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, आळंदी पोलीस स्टेशनमध्येही डोईफोडे यांचा निरोप समारंभ झाला. यावेळी वरीष्ठ निरीक्षक सुनील गोडसे, निरीक्षक जोंधळे, महिला निरीक्षक माने, सहायक फौजदार गाडेकर, सहायक फौजदार कोतवाल, हवालदार पाटील, हवालदार कावळे, हवालदार जाधव, हवालदार शेंडे, हवालदार डोमाळे, हवालदार डामसे, महिला पोलीस हवालदार म्हस्के, पोलीस कर्मचारी कुरे, पालवे, भोंडवे, चव्हाण, मुलगा सुमित डोईफोडे यांनी डोईफोडे यांना शुभेच्छा दिल्या.
डोईफोडे 1988साली पोलीस दलात भरती झाले होते. नागपूर ग्रामीण, बीड, अकोला, पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील निगडी, चिंचवड, भोसरी, दिघी-आळंदी वाहतूक विभागात त्यांनी सेवा बजावली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 186 रिवाॅर्ड्स मिळाले आहेत. खासदार बाबर यांचे अंगरक्षक म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावले. तसेच नक्षलग्रस्त भागातही काही वर्ष सेवा बजावली.