Ashok Gehlot : राजस्थानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ईडीने समन्स पाठवले आहे. ईडीने त्यांना आज २७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांची जयपूर येथील ईडी कार्यालयात चौकशी होऊ शकते. फेमाशी संबंधित एका प्रकरणात ईडी त्यांचे बयान नोंदवेल. ईडीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार असल्याचं वैभव गेहलोत यांनी म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फेमाशी संबंधित एका प्रकरणात वैभव गेहलोत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान टूरिझमशी संबंधित ट्रायटन्स हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि वर्धा एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दोन गटांवर मनी लॉन्ड्रिंगद्वारे ज्ञात स्त्रोतांच्या पलीकडे पैसे जमा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीएम अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांच्या कंपनीवर शेल कंपन्यांकडून 100 कोटी रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप आहे.
भाजपने केले आरोप
यंदाच्या जूनमध्ये भाजपने हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा यांनी याप्रकरणी ईडीकडे तक्रार केली. या प्रकरणात वैभव गेहलोतवर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2012 मध्येही वैभव गेहलोत यांच्यावर आरोप झाले होते. 2015 मध्ये ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. असा आरोप आहे की वैभवचे व्यावसायिक भागीदार रतन कांत शर्मा यांनी मार्च 2007 मध्ये ट्रायटन हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स प्रा. लि. कंपनीची नोंदणी झाली. एप्रिल 2007 मध्ये या कंपनीत रतन आणि त्याची पत्नी जुही यांच्या नावे प्रत्येकी 100 रुपये किमतीचे 2 लाख 27 हजार शेअर्स होते. यातील काही शेअर्स मॉरिशस कंपनी शिवनार होल्डिंग्सला 39,900 रुपयांच्या प्रीमियमवर देण्यात आले.