हेरगिरीच्या आरोपाखाली नौदलाच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली – पाणबुडीची गोपनीय तांत्रिक माहिती उघड केल्या प्रकरणी सीबीआयने नौदलाच्या एका विद्यमान अधिकाऱ्यासह दोघा निवृत्त अधिकाऱ्यांना अटक केली आहे. किलो श्रेणीच्या पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित काही गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप या सर्वांवर आहे.

गेल्या महिन्यात हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नौदलाने या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. ही माहिती उघड होण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हाईस ऍडमिरल आमि रिअर ऍडमिरल श्रेणीचे अधिकारी करणार आहेत. अशा स्वरुपाची घटना भविष्यात कदीही घडू नये यासाठीच्या उपाय योजनाही ही समिती सुचवणार आहे.

या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने लेफ्टनंट कर्नल श्रेणीच्या नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. हा अधिकारी सध्या मुंबईत कार्यरत आहे. पाणबुडीच्या आधुनिकीकरणासंबंधातील तांत्रिक माहिती निवृत्त अधिकाऱ्यांना पुरवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संदर्भातील सीबीआयची चौकशी सुरू असून नौदलाकडून सहकार्य केले जात आहे, असेही नौदलाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.