Arvind Kejriwal vs ED – ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आठव्यांदा समन्स बजावले. त्यांना ४ मार्च यादिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्यांना याआधी सातवेळा समन्स बजावण्यात आले. मात्र, ते एकदाही ईडीसमोर हजर राहिले नाहीत. । Arvind Kejriwal vs ED
त्यांना याआधी २६ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने आदेश दिल्यास हजर राहू अशी भूमिका घेत ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.
ईडीकडून बजावले जाणारे समन्स अवैध असल्याची भूमिका त्यांनी सुरूवातीपासून घेतली आहे. संबंधित प्रकरणात याआधी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह या आपच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. । Arvind Kejriwal vs ED