शिरूर -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण व दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिरूर येथील एकावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
सुभाष रामदेव जांभळे (रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर) असे गुन्हा झालेल्याचे नाव असून त्यास अटक केली आहे. जांभळे याने आक्षेपार्ह लिखाण करून शरद पवार यांच्याबद्दल समाजामध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने पोस्ट टाकून व्हायरल केली आहे.