राजगुरूनगर (पुणे)- खेड तालुक्यात मागील 24 तासात नव्याने 34 गावांमध्ये 115 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तर एकजणाचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात मागील 24 तासांत राजगुरूनगर 29, चाकण 15, आळंदी 5 या तीन नगर परिषदांमिळून 49 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील दोंदे 1, कडूस 1, चांडोली 1, आंबेठाण 2, बोरदरा 1, चिंबळी 4, कान्हेवाडी चाकण 1, खालूंब्रे 1, खराबवाडी 8, कुरुळी 2, कडाचीवाडी 2 म्हाळुंगे 2, मेदनकरवाडी 6, नाणेकरवाडी 1, निघोजे 2, सांगुर्डी 1, वासुली 1, वाकी खुर्द 2, येलवडी 1, कुडे बुद्रुक 1, पिंपरी बुद्रुक 1, खरपुडी खुर्द 1, राक्षेवाडी 1, वाकी बुद्रुक 3, भोसे 1, केळगाव 1, मरकळ 1, शेलगाव 1, सोळू 1, वडगाव घेनंद 6, चास 1, जऊळके खुर्द 1, कनेरसर 5, निमगाव 1 अशा 66 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.