ऍमेझॉनमधली आग विझवण्यासाठी लष्कर सज्ज

रिओ: पृथ्वीची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जात असलेल्या ब्राझिलच्या ऍमेझॉनच्या जंगलातील वाढत्या आगीविषयी जगभरच्या प्रसार माध्यमांतून तीव्र नाराजीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ब्राझिल सरकार खडबडून जागे झाले असून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. सरकारचा आपत्ती वयवस्थापन विभाग, सैन्यदलांच्या तुकड्या, स्थानिक पोलिस आणि वन विभागाच्या संयुक्त मोहिमेतून ही आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. यापूर्वी केवळ सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये आगीच्यअ उत्त्रदायित्त्वावरुन “तू तू.. मै मै…’ सुरु होते. आता स्वयंसेवी संस्थांसह सर्वच यंत्रणा आग विझवण्याच्या कामाला लागल्या आहेत.

यापूर्वी जंगलतोड केलेले क्षेत्र जळून गेले होते आणि हवा तसा पाऊस पडला नाही, असे सांगून ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सनारो यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावापुढे त्यांना नमावे लागले.

फ्रान्समधील “ग्रुप ऑफ सेव्हन’ नेत्यांच्या शिखर बैठकीत या आगीवर त्वरित चर्चा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ब्राझिल सरकारने आता विनाविलंब आग नियंत्रण यंत्रणा सज्ज केली आहे. आग विझविण्याच्या अभूतपूर्व कारवाईसाठी जवळपास 44000 ट्रूप्स उपलब्ध असतील आणि या सैन्याने जंगलाच्या आगप्रवण क्षेत्रात प्रवेश केल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. लष्कराची पहिली मोहीम रोंडनियाची राजधानी पोर्टो वेल्हो येथे 700 सैनिकांद्वारे चालविली जात आहे. सैन्याच्या दोन सी -130 हर्क्‍युलस विमानांचा वापर करुन 12,000 लिटर (3,170 गॅलन) पाणी आगीवर फवारण्यासाठी सज्ज केली आहेत.

ऍमेझॉनची जंगले असंख्य ग्रीनहाऊस वायू शोषून घेतात आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून या जंगलांना पृथ्वीची फुफ्फुसे मानले जाते. पृथ्वीवासियांना आवश्‍यक असलेल्या या जंगलाचे संरक्षण करणे हे आपल्या जैवविविधतेचा खजिना आहे, असे मानले जाते आणि ऑक्‍सिजन ज्यामुळे उत्सर्जित होतो आणि ज्या कार्बनमुळे ते शोषून घेतो त्यामुळे या जंगलांचे महत्त्व अबाधित आहे.

 काय आहेत कारणे?
बोलिव्हियाच्या चिकीटानिया प्रदेशातली जंगले कोरडी आहेत.
या हंगामात शेतकरी पिकांसाठी किंवा जनावरांसाठी जमीन साफ करण्यासाठी सामान्यत: आग लावतात, परंतु काहीवेळा हे वणवे नियंत्रणात नसतात.
यावर्षी फक्त बोलेव्हियातील 9,530 चौकिमी जंगल जाळले गेले आहे.
सरकारने जैवइंधन उत्पादनासाठी पिकांच्या वाढीव लागवडीला पाठिंबा दर्शविला आहे
पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आग लागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
बेकायदा जंगलतोड टाळण्यासाठी फायर झोनची निर्मिती केली गेली नाही

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×