चाळीस हजार वॅगन-आर मागवल्या परत

नवी दिल्ली: देशातील आघाडीची कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने नव्याने बाजारात आणलेल्या आणि 15 नोव्हेंबर 2018 ते 12 ऑगस्ट 2019 या काळात तयार झालेल्या वॅगन-आर हॅचबॅक फोर्थ जनरेशन कारमध्ये त्रुटी आढळल्याने कंपनीने तब्बल 40 हजार 168 कार्स परत मागवल्या आहेत. या मॉडेलच्या 1.0 लिटर पेट्रोल इंजिनच्या फ्युएल होजच्या मॅकॅनिझममध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात मारुती सुझुकी इंडियाने म्हटले आहे की, कंपनीचे सर्व डिलर्स 25 ऑगस्टपासून या कार्सच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या कारची तपासणी करुन घेण्याचे आवाहन करणार आहेत. त्याचबरोबर संबंधीत कारमधील फ्युएल होजच्या मेटल क्‍लॅम्पमध्ये बिघाड असल्यास त्यांना तो मोफत बदलून दिला जाईल. कंपनी जागतिक स्तरावर या कार्सच्या तपासणीची मोहिम राबवणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मारुती सुझुकीने मध्यवर्गीयांमध्ये प्रसिद्ध असलेली वॅगन-आर कार नव्या बदलांसह आणि सुविधांसह भारतात लॉन्च केली आहे. ही नवी कार कॉम्पॅक्‍ट हॅचबॅकसह दोन इंजिनांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1 लिटर, 3 सिलिंडर पेट्‍रोल इंजिन आणि 1.2 लिटर, 4 सिलिंडर पेट्रोल मोटरचा समावेश आहे. या दोन इंजिनांसह 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्‍सही यामध्ये आहे. तर काही निवडक कार्समध्ये 5 स्पीड एएमटी युनिटही देण्यात आले आहे.

त्याचबरोबर या नव्या वॅगन-आरमध्ये पहिल्यांदाच स्टेअरिंगवरच ऑडिओ कंट्रोल बटनासह टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम ऍन्ड्रॉईड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह देण्यात आले आहे. त्याचबरोबर नवी वॅगन-आर ही जुन्या कारपेक्षा जास्त सुरक्षित आहे. त्यासाठी कारमध्ये दोन एअर बॅग्ज, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर्ससाठी सीट बेल्ट, अतिवेगाची इशारा देणारी यंत्रणा उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)