मुंबई – अभिनेता अर्जुन रामपाल चित्रपटांपेक्षा सध्या खासगी आयुष्यासाठी अधिक चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. लवकरच अर्जुन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अर्जुनची प्रेयसी गॅब्रियला डिमेट्रियड्स हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून गर्भवती असल्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप या दोघांनी लग्न केले नसल्याने याची अधिक चर्चा होत आहे.
अर्जुन हा घटस्फोटित असून त्याने पहिलं लग्न 1998मध्ये मेहेर जेसिया या सुपर मॉडेलशी विवाह केला होता. या लग्नात त्याला महिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत. अर्जुन-मेहेर यांनी 2019मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अर्जुन दक्षिण आफ्रिकन प्रेयसी गॅब्रिला डॅमॉट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव एरिक असून तो तीन वर्षांचा आहे.
View this post on Instagram
मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर करत दुसर्यांदा गरोदर असल्याचे सांगितले. फोटो शेअर करताना गॅब्रिएलाने “हे खरंच आहे की एआय आहे?” असे कॅप्शन दिलं. फोटोंमध्ये तिने ऑरेंज कलरचा गाउन घातला आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी दोघांचे अभिनंदन केले आहे.