Nilesh Sable New Show| झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर आता या शोचा मुख्य सूत्रधार निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कलर्ल मराठीवर एका नव्या शोमध्ये तो पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत दोन विनोदवीर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
“हसताय ना? हसायलाच पाहिजे!!” असे निलेश साबळेच्या नव्या शोचे नाव आहे. यात निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार आहेत. “हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!” या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार त्यांना साथ देणार आहेत. Nilesh Sable New Show|
तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॉमेडी किंग अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. .निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदाचे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. Nilesh Sable New Show|
हेही वाचा :
शिरूरमध्येही तिहेरी लढत ; वंचितकडून दोन वर्षे तुरुंगात कैद असणाऱ्या ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर