मुंबई – वयाच्या 16 व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल ‘हम पांच’ मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री ‘विद्या बालन’ (Vidya Balan) ही बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींनपैकी एक म्हणून ओळखले जाते.
विद्या बालनने अनेक चित्रपटात काम करत आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावरून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी विद्या बालन आज एक लोकप्रिय आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
‘भुल भुलैय्या’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मिशन मंगल’, ‘परिणीता’, ‘बेगम जान’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शंकुतला देवी’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून विद्या बालनने अभिनयाची छाप पाडली आहे. आणि त्यामुळेच अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात चाहते आहेत.
विद्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले आगामी प्रॉजेक्ट आणि चित्रपट याबद्दल ती सतत फॅन्सला अपडेट देत असते. मात्र, नेहमीच आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी विद्या सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याची फॅन झाली आहे.
नुकतंच अभिनेत्री तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला असून, तिचा हा हटके अंदाज पाहून चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत. या व्हिडिओत विद्याने लाल रंगाची साडी नेसून एका टिपिकल बाईचा लूक केला आहे. यामध्ये विद्या भाऊ कदमच्या (bhau kadam) आवाजातील डायलॉग बोलत आहे.
‘सिगरेट ओढता का? दारू पिता? सुपारी? काहीच नाही हिला व्यसन…सगळं नाही नाही म्हणता…मी काय मागणारे तुमच्याकडे हा म्हटल्यावर…एकतरी व्यसन पाहिजे. पथ्य काय सांगू तुला मी…असा पोपट नाही करायचा डॉक्टरचा..’
View this post on Instagram
हे भाऊ कदमच्या आवाजातील डायलॉग म्हणत विद्याने मजेशीर रील बनवला आहे. तिच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट अश्या कमेंट केल्या असून, हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.
एक दमदार विनोदवीर ‘भाऊ कदम’ –
मराठी इंडस्ट्रीमध्ये विनोदी कलाकार, अभिनेता भाऊ कदम (bhau kadam) ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून सर्वांना हसवत असतात. भाऊ कदम यांनी लोकांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे.
विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली असून, एक दमदार विनोदवीर म्हणून भाऊ कदम याचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं आहे.