Bhau Kadam : ‘चला हवा येऊ द्या’ (chala Hawa yeu dya) या कार्यक्रमातून अभिनेता भाऊ कदम घराघरात पोहचला. त्याच्या विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे तो खास करून ओळखला जातो. मात्र सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून भाऊ कदम (Bhau Kadam) सिनेसृष्टी सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे त्याच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हायरल फोटोने सर्वचजण चकित झाले आहेत.
मात्र व्हायरल होणार लुक भाऊ कदमच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या आगामी चित्रपटाचा आहे. ‘बाबा गुलाबी गरम’ ही व्यक्तिरेखा ते यात साकारणार आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे ‘बाबा गुलाबी गरम’ यांची लीला चित्रपटात पहाण्याची गंमत वेगळी आहे. लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. तसेच भाऊ कदम यांनी या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा खूप मजेशीर असल्याचेही सांगितले आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात भाऊ कदम यांच्या सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, सुशील इनामदार असे दमदार विनोदवीर या चित्रपटात आहेत. मात्र सध्या भाऊ कदम यांच्या या फोटोमधील त्यांचा बाबा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.