सिंगापूर – जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या सिंगापूरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे 2021 च्या तुलनेने 2022 या वर्षांमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण 25% ने वाढले आहे.
गेल्या वीस वर्षांच्या कालावधीतील हे सर्वात जास्त प्रमाण आहे आत्महत्या त्या विषयावर काम करणाऱ्या समर्पियन ऑफ सिंगापूर या संस्थेने याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून आत्महत्यांच्या विविध कारणांची चर्चा या अहवालात केली आहे 2022 या एका वर्षामध्ये 476 जणांनी आत्महत्या केली आहे त्यामध्ये अनेक वेळा वैवाहिक कारणे किंवा आर्थिक कारणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे साधारणपणे आरोग्य, रोजगार आणि कौटुंबिक नातेसंबंध याच कारणावरून लोक आत्महत्या करताना दिसत आहेत.
म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी आलेले नैराश्य असो किंवा नोकरी न मिळण्यामुळे आलेले नैराश्य असो किंवा लग्नानंतर निर्माण झालेले संघर्ष असोत या सर्व कारणांमुळे अनेकजण आत्महत्या करत आहेत गेल्या चार वर्षातील आकडेवारीचा विचार करता दहा ते 29 या वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आत्महत्या हेच असल्याचे समोर आले आहे 70 ते 79 या वयोगटातील लोकांनीही आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे गेल्यावर्षी ज्या 476 लोकांनी आत्महत्या केली त्यापैकी 316 पुरुष होते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर सुसाईड प्रिव्हेंटेशन या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगभरात प्रत्येक 100 मृत्यूमागे एक आत्महत्या असते साहजिकच आगामी कालावधीमध्ये सर्वच देशांना या विषयाकडे गंभीरपणे पाहावे लागणार आहे.