पुणे – पूना क्लबच्या वतीने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथे आजपासून सुरू होत आहे. जेट सिंथेसिस, देसाई ब्रदर्स, फिनलॅंड इंटरनॅशनल स्कूल हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक तर ब्रिहन नॅचरल प्रॉडक्टस हे सहयोगी प्रायोजक आहेत, अशी माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष शशांक हळबे यांनी दिली.
स्पर्धेचे यंदा 8 वे वर्ष असून, अंतिम लढत 12 मार्चला होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई, उपाध्यक्ष सुनील हांडा, अमेय कुलकर्णी, मुख्य प्रायोजक राकेश नवाणी, तारीक पारवानी, उमेश पिल्लई, रणजित पांडे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत क्लबमधील 12 ते 55 वयोगटातील सदस्य सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात 12 ते 14 खेळाडू असणार आहेत. यातील 9 खेळाडू मैदानात असतील.
ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरी स्वरूपात होणार आहे. प्रत्येक सामना 6 षटकांचा असणार आहे. स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटांतून चार संघ उपांत्य फेरीत दाखल होतील आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाणार आहे.