नवी दिल्ली :- कॉम्प्यूटर कंपनी अॅपटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. अनिल पंत यांचे मंगळवार, दि. 15 ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. डॉ. अनिल पंत यांचे योगदान आणि ऊर्जा आता कंपनीला मिळणार नाही, असे कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
डॉ. पंत हे 19 जून महिन्यापासून सुट्टीवर गेले होते. यानंतर कंपनीने तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी कंपनीचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी निवडक सदस्य आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांचा समावेश समावेश असलेली अंतरिम समिती स्थापन केली होती.
डॉ. पंत हे 2016 पासून ऍपटेकचे एमडी आणि सीईओ होते. यापूर्वी पंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसारख्या कंपन्यांशी संबंधित होते. डॉ. पंत हे 25 वर्षांहून आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रात गुणवत्ता, विक्री, वितरण, विपणन आणि उत्पादन व्यवस्थापन यासारख्या विभागांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
डॉ. पंत यांनी बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिक पदवी (बीई), लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज आणि मलेशिया येथून माहिती तंत्रज्ञानात पीएचडी केली.