पुणे – जिल्ह्यातील दिघी (आळंदी) येथील विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठाणच्या प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्रास औदयोगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने मान्यता दिली आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत असतात. मोठे किंवा जोखमीचे काम करताना अपघात होण्याची शक्यता असते. अपघात झाल्यास गोल्डन पिरियडमध्ये जीव कसा वाचवायचा यासाठी कामगारांना प्रथमोपचार करता येणे आवश्यक आहे, असे प्रशिक्षण विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठानमध्ये देण्यात येते.
विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठानच्या डॉ. भार्गवी बडे म्हणाल्या की, कोणताही अपघात झाल्यास प्रथमोपचार आवश्यक आहेत. प्रथमोपचार प्रशिक्षणाने जीव वाचतो. तसेच आजाराचे गांभीर्य कमी होते. आगामी 2030पर्यंत 3 लाख प्रथमोपचार करणाऱ्या कामगारांची संघटना करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठाणच्या प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्रास औदयोगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने मान्यता दिल्याबद्दल डॉ. बडे यांचे युवा कामगार नेते उदय गायकवाड, औदयोगिक सुरक्षा संचलनालय मराठवाडा विभागाचे सहसंचालक श्रीराम दिगंबर दहीफळे यांनी अभिनंदन केले.