इंडो-कॅनेडियन गायक आणि रॅपर एपी ढिल्लोंची गाणी आजकाल सुपरहिट आहेत. एपी ढिल्लों हा तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय गायक बनला आहे. ‘ब्राउन मुंडे’ सारखी ब्लॉकबस्टर गाणी देणारा एपी ढिल्लों त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. त्याचे नाव बॉलिवूडमधील एका मोठ्या स्टार किडशी जोडले जात आहे. आपल्या रोमँटिक आवाजाने, एपी ढिल्लनने बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या धाकट्या बहिणी ख़ुशी कपूरचे हृदय चोरले आहे. एपी ढिल्लॉन स्टार किड खुशी कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहे.
एपी ढिल्लों आणि खुशी कपूरच्या डेटिंगच्या बातम्यांनी बी-टाऊनमध्ये खळबळ उडाली आहे. खुशी कपूर एपी ढिल्लोंच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या येत आहेत. एपी ढिल्लोंने खुशी कपूरच्या नावाने एक गाणे तयार केल्यावर या बातम्या समोर आल्या. गायकाने ख़ुशीच्या नावावर एक गाणे समर्पित केले आहे.
एपी आणि खुशी यांच्यातील रोमान्सच्या बातम्यांनी जोर धरला. दोघांच्या अफेअरबाबतही चाहते अंदाज लावत आहेत. ‘ त्याने त्याच्या लेटेस्ट सिंगल अल्बम ‘ट्रू स्टोरीज’मध्ये खुशी कपूरच्या नावाने एक गाणे बनवले आहे. त्याचे ‘जदों हसे तन लागे तू खुशी कपूर’ हे गाणे खूप लोकप्रिय होत आहे. श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरही तिच्या अभिनय पदार्पणामुळे चर्चेत आहे. खुशी लवकरच नेटफ्लिक्स चित्रपट ‘द आर्चीज’मधून पदार्पण करणार आहे.