मुंबई – उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रा सुरू झालीये. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. केदारनाथ धाममध्ये दरवेळेप्रमाणे याही वेळी घोडे आणि खेचरांची व्यवस्था करण्यात आली आहे. जे लोक चालू शकत नाहीत किंवा थकतात. ते या प्राण्यांच्या पाठीवर स्वार होऊन संपूर्ण आरामात आपला प्रवास पूर्ण करतात.
#Uttrakhand Some people are making a horse smoke weed forcefully at the trek of Kedarnath temple.@uttarakhandcops @DehradunPolice @RudraprayagPol @AshokKumar_IPS
should look into this matter and find the culprit behind thispic.twitter.com/yyX1BNMiLk— Himanshi Mehra 🔱 (@manshi_mehra_) June 23, 2023
दरम्यान, या पवित्र निवासस्थानातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन लोक घोड्यासोबत गैरवर्तन करत आहेत. ते त्याला जबरदस्तीने सिगारेट देत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने घोड्याला सिगारेट दिल्याचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. शेअर करण्यासोबतच तिने लिहिले की, ‘आम्ही आमच्या पवित्र ठिकाणी घोड्यासोबत होणारे अत्याचार थांबवू शकतो का?’ एवढेच नाही तर रवीनाने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पीएमओ इंडिया यांनाही टॅग केले आहे आणि लिहिले आहे की, ‘अशा लोकांना काय अटक केली पाहिजे?
व्हायरल व्हिडीओ बद्दल बोलायचे झाले तर दोन लोकांनी घोडा पकडून ठेवल्याचे दिसून येते. एका माणसाने तोंड आणि नाकपुड्या हाताने घट्ट दाबल्या आहेत. तर, दुसरा बळजबरीने दुसऱ्या नाकपुडीतून सिगारेट भरत आहे. काही वेळाने घोडा नाकातून सिगारेटचा धूर सोडताना दिसतो.