पशूंबाबतच्या क्रौर्याविरोधात कडक कायदे हवे- अनुष्का शर्मा

प्राणी मित्र आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी सतत आग्रही असलेली अनुष्का शर्मा आता पशू क्रुरतेच्या विरोधात अधिक कडक कायदा व्हावा, अशी मागणी करायला लागली आहे. पशू क्रौर्याविरोधात 1960 साली एक कायदा करण्यात आला आहे.

मात्र त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनुष्काने केली आहे. तिच्या या उपक्रमाला “जस्टीस फॉर ऍनिमल्स’ असे नाव देण्यात आले आहे. प्राण्यांबाबत क्रूरतेने वागणाऱ्यांच्याना अधिक कडक शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना लकी नावाचे एक भटके कुत्रे एका इमारतीत आसऱ्यासाठी आले होते. तेंव्हा तेथील वॉचमनने त्या कुत्र्याला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या त्या कुत्र्याचा अलिकडेच मृत्यू झाला. लकी सारख्या कित्येक पशूंना अमानवी वाग्णूक मिळाली आहे. देशभरात लकीसारख्या कित्येक प्राण्यांना अशा मारहाणीला बळी पडावे लागते.

अशी अनेक उदाहरणे अनुष्काने इन्स्टाग्रामवरच्या आपल्या पोस्टमध्ये लिहीली आहेत. अनुष्का प्रमाणेच जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, सोनम कपूर, अक्षय कुमार आणि आलिया भट यांनीही मुंबईतील घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.