जान्हवीने शेअर केले मोनोक्रोम फोटोज्‌

बॉलिवूडमध्ये “धडक’ चित्रपटातून डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या गुंजन सक्‍सेना यांच्या “कारगिल गर्ल’ या बायॉपिक चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग जॉर्जिया येथे करण्यात येत असून तेथील शेड्यूल पूर्ण करण्यात आले आहे. जान्हवीने सेटवरील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये जान्हवीचे निखल हास्य आणि डायरेक्‍टर शरण शर्मा हे जान्हवीला केक भरविताना दिसत आहे. या मोनोक्रोम कॅंडिड फोटोज्‌ पोस्ट करत “रुला दिया’ असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कारगिल गर्ल’ भारतीय हवाई दलाची पायलट गुंजन सक्‍सेना यांची बायॉपिक आहे. 1999मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात सहभागी होणा-या त्या पहिल्या पायलट ठरल्या होत्या. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी हेही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

वर्क फ्रंटबाबत बोलयाचे झाल्यास जान्हवी या बायॉपिकशिवाय करण जोहरच्या “तख्त’ चित्रपटात झळकणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंह, विकी कौशल, करीना कपूर-खान, आलिया भट्ट, भूमि पेडणेकर आदी स्टारकास्ट काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)