मुंबई – माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी (18 जुलै) ‘ओव्हर द टॉप’ (OTT) प्लॅटफॉर्मवर सामग्रीबाबत कडक सूचना दिल्या आहेत. सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली सरकार भारतीय संस्कृती आणि समाजाचा अपमान होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. काल त्यांनी ओटीटी व्यासपीठाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
त्यांनी व्यासपीठावरून OTT प्रतिनिधींना सांगितले की, ‘असा मजकूर प्रसारित करू नये, ज्यामुळे चुकीची माहिती पसरते आणि प्लॅटफॉर्मचा वापर वैचारिक पूर्वाग्रहासाठी केला जाऊ नये हेही लक्षात ठेवा. अनुराग ठाकूर पुढे म्हणाला, “भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. OTT प्लॅटफॉर्मने देशाची एकूण जाणीव प्रतिबिंबित केली पाहिजे आणि सर्व वयोगटातील लोकांना चांगला अनुभव देणारी सामग्री प्रदान केली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला पुढे नेत आहोत, अशात ही व्यासपीठे देशाच्या सांस्कृतिक विविधतेसाठी संवेदनशील असली पाहिजेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे लक्ष्य साध्य करण्यासाठी युती आणि संपर्क मजबूत करण्यावर भर देत आहे. त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता दाखवली जाणार नाही याची काळजी घेणे ही ओटीटी प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे.’