अलिकडेच तापसी पन्नूचा “थप्पड’ रिलीज झाला. सिनेमाचे विश्लेषकांनी खूप कौतुक केले. मात्र पब्लिकला हा सिनेमा काही विशेष रुचला नाही. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा काही विशेष परिणाम झाला नाही. काही मॅगझीनमधून “थप्पड’च्या रिझल्टवर खूप जोरदार टीका केली. एका मॅगझीनने “प्रेक्षकांनी लगावली थप्पड’ असे म्हटले. त्यामुळे “थप्पड’चा डायरेक्टर अनुभव सिन्हा खूप भडकला. या सिनेमावर टीका करणाऱ्यांना त्याने सोशल मिडीयावरून खूपच शिव्या द्यायला सुरुवात केली.
“थप्पड’च्या आगोदर “आर्टिकल 15′ ,”मुल्क’ आणि “तुम बिन’सारख्या चांगल्या नावाजलेल्या सिनेमांचे डायरेक्शनही अनुभव सिन्हाने केले आहे. त्याच्या डायरेक्शन स्कीलचा असा अपमान त्याला सहन झाला नाही. त्याच्या रागातून आलेली प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. पण ही प्रतिक्रिया जरा जास्तच जहाल होती. हे डायरेक्टर सुधीर मिश्राच्या ध्यानात आले. त्यांनी ते अनुभव सिन्हाच्या ध्यानात आणून दिले. “थप्पड’ने पहिल्या आठवड्यात 23 कोटींची कमाई केली हे देखील ध्यानात आणून दिले. पण तरिही अनुभव सिन्हा थांबला नाहीच. त्याने “थप्पड’ला वाईट म्हणणाऱ्यांना शिव्या देणे सुरूच ठेवले. या शिवीगाळीला अनेकांनी नाराजीचे प्रत्युत्तर दिले आहे.