कोरोनापासून दीर्घकाळ सुरक्षा देण्यात अँटिबॉडी असमर्थ

बाधित झाल्याच्या 60 दिवसांनंतर प्लाझ्माही हळूहळू निष्क्रिय

नवी दिल्ली – भारतात कोराेना विषाणूचा परिणाम इतर देशांच्या तुलनेत भिन्न स्वरूपात दिसतोय. कारण विषाणूविरोधातील अँटिबॉडी भारतीयांनी दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यात असमर्थ ठरतेय. त्यामुळे लोक पुन्हा बाधित होत आहेत.

आयसीएमआरनुसार देशात आतापर्यंत ४.५ टक्क्यांहून जास्त लोकांना एकापेक्षा जास्त वेळा बाधा झाली आहे. जगभरात पुन्हा संसर्ग होण्याचा दर सुमारे एक टक्का आहे. मात्र भारतात बाधित झाल्याच्या ६० दिवसांनंतर शरीरातील प्लाझ्मादेखील हळूहळू निष्क्रिय होत असल्याचे दिसते.

सीएसआयआरच्या संशोधकांनी राष्ट्रीय पातळीवर एक पाहणी केली आहे. त्यात देशातील अनेक भागांत विषाणूचा स्थानिक पातळीवर फैलाव झाल्याचा दावा करण्यात आला. नवी दिल्लीतील आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले, बाधितांमधील ३० टक्के लोकांमध्ये १५० ते १८० दिवसांपर्यंत अँटिबॉडी होत्या. काही बाबतीत तीन महिन्यांतच अँटिबॉडी संपल्याचे दिसून आले. विनालक्षण असलेल्या लोकांत अँटिबॉडीचा कमकुवत स्तरही पाहायला मिळाला. अँटिबॉडी कमी झाल्याने देशात पुन्हा संसर्ग वाढीचा वेग दिसून आला आहे.

चीनचे रोगनियंत्रण केंद्राचे संचालक गाआ फू यांनी देशाची कोरोना लस बचावाच्या पातळीवर जास्त प्रभावी नसल्याची कबुली दिली. गाआ म्हणाले, समस्येचे निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राच्या लसींचा वापर करणे असाही पर्याय होऊ शकतो. इतर देशांतील तज्ञही अशा पर्यायावर अभ्यास करू लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.