लोणावळा, दि. 4 – लोणावळ्यात जलतरण तलावात बुडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. बुधवारी (दि. 4) चिंचवडमधील एका तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.
निखिल संपत निकम (वय 22, रा. थेरगाव, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल नानासाहेब निकम (वय 32, शिवराम हाईट, विष्णुदेव नगर, पुनावळे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
लोणावळ्यातील जुना खंडाळा भागातील अशोक निर्वान सोसायटी मधील पाम ग्रो या खासगी बंगल्यात मंगळवारी निखिल हा अजिंक्य टकले, सत्यजित काळभोर, शुभम लांडे, रत्नसिंह कुलकर्णी, प्रतिक खोसे व त्याच्या इतर काही मित्रांसोबत रत्नसिंह कुलकर्णी याचा वाढदिवस साजरा करण्याकरिता आले होते. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास निखिल जलतरण तलावात पडला. त्यानंतर त्याला उपचाराकरिता लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.