पुरंदर तहसीलला करोनाचा विळखा आणखी घट; परिसरात भीतीचे वातावरण

सासवड -पुरंदर तालुक्‍याचा कारभार ज्या तहसील कार्यालयातून चालतो. त्या तहसील कचेरीच्या आवारामध्ये 16 नागरिक, कर्मचारी बाधित आढळले आहे, त्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील टपरीधारक व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली होती. संबंधित तहसील कार्यालयातील टपरीधारकांचा मोठ्या प्रमाणावर यामध्ये समावेश आहे.

तर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. तहसील कार्यालयातील 3 कर्मचारी व 4 तलाठी, परिसरातील 9 टपरीधारक बाधित असल्याने कार्यालयाच्या आवारात आता करोनाने घेरले आहे.

दरम्यान, सासवड नगरपरिषदेच्या वतीने तात्काळ तहसील कार्यालय, न्यायालयाच्या आवारात सोडियम क्‍लोराइडची फवारणी करण्यात आली.

करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता अत्यावश्‍यक कामासाठीच नागरिकांनी तहसील कार्यालयात यावे. विनाकारण कार्यालयामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
– सूर्यकांत पठाडे, नायब तहसीलदार पुरंदर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.