बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसोहळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच 2021 संपणार असून 2022 सुरू होणार आहे, पण 2021चा शेवट बॉलीवूड सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांनी होणार आहे.
राजकुमार रावपासून कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत अनेक बड्या कलाकारांचा यात समावेश आहे. अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे.
अशातच अंकिता सात फेरे घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरून तिच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते. अंकिताने आणि तिच्या प्रियकाराने त्यांच्या लग्नसोहळ्या दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिता आणि विकी जैनने शेअर केलेल्या फोटोंत त्यांचे नातेवाईकदेखील दिसत आहेत.
अंकिताने गुलाबी सोनेरी बॉर्डर असलेली हिरव्या रंगाची साधी साडी नेसली आहे. मराठी परंपरेनुसार अंकिता आणि विकीने कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. अंकिताने शेअर केलेल्या फोटोत ती विकीच्या मांडीवर बसलेली असून आनंदात असल्याचे दिसून येत आहे.