Animal Movie : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा नुकतचा ट्रेलर रिलीज केला असून, रणबीर ‘अॅनिमल’मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. या सिनेमात वडील आणि मुलाचे अनोखे नाते दिसणार आहे.
मुलगा वडिलांसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो पण त्यालाही वडिलांबद्दल चिडच असते. दोघेही एकमेकांवर रागावतात आणि टोमणे मारतानाही दिसतात. ट्रेलर वरून हा चित्रपट प्रतिस्पर्ध्याची कथा आहे असे दिसते पण कथेचा सुगावा लावणे खूप कठीण आहे. याशिवाय चित्रपटातील रणबीर आणि रश्मिकाचा रोमान्स कधी आंबट तर कधी गोड असल्याचं दिसून येत आहे.
यासोबतच अभिनेता बॉबी देओल फुल फॉर्ममध्ये दिसत असून, या चित्रपटातील त्याची भूमिका किती खतरनाक आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या घोषणे पासूनच बॉबीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते पण ट्रेलरच्या शेवटी त्याने लोकांच्या मनात दहशत पसरवली आहे. (Animal Movie)
दरम्यान, आता पासूनच ‘अॅनिमल’ सिनेमाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून हा सिनेमा ‘पठाण आणि जवान’चे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज असल्याचं यातून दिसून येत आहे. सिनेमाच्या आगाऊ बुकिंगचे (Animal Advance Booking) आकडे लक्षात ‘अॅनिमल’ मोठ्या पडद्यावर धमाल करणार हे नक्की.
गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता हैदराबादमध्ये चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसाठी काही स्लॉट उघडण्यात आले आणि काही तासांतच या चित्रपटाची 5000 हून अधिक तिकिटे विकली गेली. अॅडव्हान्स बुकिंग अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही, ते 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, यूएई आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी या चित्रपटाची आगाऊ बुकिंग वीकेंडला सुरू होईल.