मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत खूप व्यस्त आहे. अलीकडेच शशांक खेतान दिग्दर्शित “योद्धा’ चित्रपटात तो काम करणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
मात्र, आता शाहिदने या चित्रपटाला नकार दिल्याचे समजते. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच मेकर्स आणि शाहिदमध्ये वाद झाला आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत शाहिद आणि निर्मात्यांमध्ये काही मतभेद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शाहिदने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.
View this post on Instagram
“कबीर सिंह’च्या यशानंतर शाहिद काही निवडकच चित्रपट स्वीकारत आहे. याशिवाय शूटिंगच्या तारखांमध्येही तो फार नाखूष होता. यामुळे करण जोहर अधिकृतपणे आपल्या चित्रपटाची घोषणा करू शकलेला नाही. वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शाहिद कपूर लवकरच साऊथ स्टार विजय सेठूपतीसोबत डिजिटल डेब्यू करणार आहे.
View this post on Instagram
सध्या या सीरीजचे टायटल निश्चित करण्यात आलेले नाही. याचे शूटिंग मुंबई आणि गोव्यात होणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांची जोडी करणार आहे. याशिवाय मृणाल ठाकूरसमवेत “जर्सी’मध्ये शाहिद झळकणार आहे.
View this post on Instagram