मुंबई – छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ मधील यंदाचा विकेंडचा वार सर्व प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आहे. कारण खुद्द सलमान खानने बिग बॉसच्या घरातील टॉयलेट, किचन आणि इतर गोष्टींची साफसफाई केली.
स्वचतेवरून घरातील सदस्य एकमेकांशी भांडताना दिसले. या भांडणात एक झाले बिग बॉसचे घर कधी नव्हे इतके अस्वच्छ झाले कि, खुद्द सलमान बिग बॉसच्या घराची स्वच्छता करण्यासाठी आता पोहोचला. आणि घराची साफसफाई करू लागला. दरम्यान, यावेळी आपली ‘घाण’ सलमान साफ करतोय म्हटल्यावर घरातल्या सदस्यांची अवस्था खूप बिकट झाली.
दरम्यान, लवरच ‘बिग बॉस १३’ला सलमान खान अलविदा म्हणणार आहे. जवळपास एक दशक सलमान या शोसोबत निगडित आहे. दरवर्षी तो बिग बॉस शो होस्ट करताना दिसतो. गेले अनेक वर्षे या शो सोबत जोडला गेलेला सलमान यंदा मात्र शोच्या फिनालेच्या आधीच शोमधून रजा घेत आहे. या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात सलमानचा बिग बॉस मधील संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.