मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत अभिनेत्री नसली तरी सतत चर्चेत असते. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीला मागे टाकेल असे मीराचे सौंदर्य आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
यामुळे मीरा कोणत्याही ठिकाणी दिसली तरी तिच्यावर कॅमेऱ्याची नजर असते. एवढंच नाही स्वतः मीरा अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशाच एका फोटोमुळे मीरा सध्या चर्चेत आली आहे.
या फोटोमुळे मीराला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोल होणाऱ्या फोटोमध्ये ती पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये मीरा ग्लॅमरस दिसत आहे. पण फोटोमधील तिच्या पायांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
यावर मीरानेदेखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मीरा म्हणाली, सदैव माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि माझ्या पायाचे कौतुक केल्याबद्दल आभार मानायचे आहेत. माझे पाय मला नेहमीच जमिनीवर ठेवतात.’ मीराचे हे सडेतोड उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे.
मीराचा पती शाहीदच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो लवकरच “जर्सी’त झळकणार आहे. हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यात शाहीदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारत आहे.