बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आगामी “खाली पीली’ या चित्रपटात झळकणार आहे. यात ती पूजा म्हणून भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनन्याने याचा फर्स्ट लुक चाहत्यांशी शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करत अनन्याने पोस्ट केले की, पूजासाठी फर्स्ट लुक टेस्टची हे जुने फोटो आणि आता हा चित्रपट दोन दिवसांत रिलीज होणार आहे. इंस्टाग्रामवरील या फोटोंपैकी एका फोटोत अनन्या एका पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्टसमध्ये खूपच सुंदर अशी दिसत आहे.
तर अन्य एका फोटोत पिंक आउटफिटमध्ये अनन्याची मोहक अदा दिसून येते. सध्या सोशल मीडियावर अनन्याचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.
अनन्याच्या चाहत्यांना हे फोटो खूपच आवडले असून काही जणांनी तिला “हॉट’, तर काही जणांनी “प्रिटी’ अशी कमेंटस् केल्या आहेत. “खाली पीली’मध्ये अनन्यासोबत ईशान खट्टर मुख्य भूमिका साकारत आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अनन्या पांडे ही शकून बत्राच्या एका चित्रपटातही काम करत आहे. यात तिच्यासोबत दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी निर्णायक भूमिका साकारणार आहे. तसेच विजय देवरकांडासोबतही एका चित्रपटात अनन्या झळकणार आहे.
View this post on Instagram