आणखी एका चित्रपटात झळकणार अनन्या पांडे

बॉक्‍स ऑफिसवर नुकताच डायरेक्‍टर पुनीत मल्होत्रा याचा “स्टूडेंट ऑफ द इयर-2′ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु या चित्रपटातून पर्दापण करणारी अभिनेत्री अनन्या पांडेच्या भूमिकेची प्रेक्षकांनी खूप स्तुती केली. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्याच्या डायलॉग डिलिव्हरी आणि तिचा ऑन स्क्रीन परफॉर्मेंस पाहता क्रिटिक्‍सनेही तिचे अभिनंदन केले.

आता अनन्या ही अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री भूमि पेडनेकरसोबत मुद्‌दस्सर अजीज यांच्या “पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच झळकणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्या प्रर्दशित होणार आहे.

या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत आणि कार्तिकसोबतच्या बॉन्डिंगबाबत या अभिनेत्रींनी एका मुलाखतीत दिलखुलास माहिती दिली. चित्रपटातील आपल्या कॅरक्‍टरबाबत त्या म्हणाल्या, हा चित्रपटा एकदम वेगळा आहे. मी एक जुनी भूमिका साकारत असून ती “स्टूडेंट ऑफ द इयर 2’पेक्षा एकदम वेगळी आहे.

हा चित्रपट पूर्णपणे रीमेक असून फक्‍त त्या चित्रपटाचा आधार घेण्यात आला आहे. हा मुळ चित्रपटाचा नवीन व्हर्जन आहे, असे अनन्या म्हणाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.