मुंबई – अनन्या पांडे सध्या आपल्या आगामी लायगर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनन्या साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत लायगरमध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. यासाठीच ती विजयसोबत अनेक ठिकाणी फिरत आहे आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहे. अशाच एका संवादात तिने ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे.
अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या पांडेने ट्रोल्सबद्दल सांगितले. यावेळी अनन्या सोशल मीडियावर ट्रोल होण्याबाबत उघडपणे बोलली. अनन्या सतत ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमुळे मी खूप दुखावली जाते, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. नकारात्मक गोष्टी वाचून अस्वस्थ होत असल्याचे मतही अनन्याने यावेळी व्यक्त केले.
जेव्हा मी माझ्याबद्दल नकारात्मक गोष्टी वाचते तेव्हा मला खूपच वाईट वाटते तसेच मी स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून मी स्वतःला कसे सुधारू शकते याकडे फोकस करेल असे देखील अनन्याने यावेळी सांगितले. अनन्या काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील विजय देवरकोंडाच्या घरी देखील गेली होती.
लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगनाथ यांनी केले आहे. ‘लाइगर’ हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमेरिकन बॉक्सर माईक टायसन देखील छोट्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रम्या कृष्णनही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.