महर्षीनगर, दि. 26 (प्रतिनिधी) -नवीन प्रभाग क्रमांक 39 मध्ये सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना गणेशमूर्ती फक्त पाच रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, उल्हास पवार, कमल व्यवहारे, अनिल गेलडा, दिनेश छाजेड, द.स.पोलिकार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
अरविंद शिंदे म्हणाले की, आपण समाजाला काही देणे लागतो म्हणून एक छोटीसी मदत सुराणा यांच्याकडून या उपक्रमातून होत आहे. गणेश भक्तांना गणपती बाप्पाची मूर्ति फक्त पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे, ही कौतुकाची बाब आहे. ही खरी निस्वार्थ सेवा आहे.
अभय छाजेड म्हणाले की, यापुढील काळात सण, उत्सव साजरे करताना माणुसकी जपत गरजूंना मदत करणे गरजेचे आहे. महागाईच्या काळात भरत सुराणा यांचा उपक्रम स्तुत्यच आहे.
यावेळी उल्हास पवार, बाळासाहेब अटल, दिनेश छाजेड, रमेश सोनकांबळे, अनुसया गायकवाड, शर्वरी गोतारणे, अविनाश गोतारणे, अल्ताफ सौदागर, नितीन निकम, सुरेश चौधरी, विश्वास दिघे, भारत काळे, रजिया बल्लारी, मेहबूब लांडगे आदी उपस्थित होते.