मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सामाजिक कार्यासह आपल्या गायनाची कला देखील जोपासत असतात. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. २०२३ या नवीन वर्षी अमृता फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
अमृत फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या अपकमिंग गाण्याची घोषणा केली आहे. गाण्यातील काही ओळी लिहीत अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे… अशा या ओळी असून अमृता फडणवीस यांनी यासोबतच आपल्या नव्या लुकचा फोटो देखील शेअर केला आहे. ज्याची चाहत्यांना प्रचंड भुरली पडली आहे.
अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,
तेरे नाल ही नचणा वे !!An electrifying , Biggest Bachelorette Anthem of the Year ……
Coming on 6th Jan ‘2023 – only on @TSeries pic.twitter.com/OmKifS03ZN
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 2, 2023
टी सिरीजवर येत्या ६ जानेवारी रोजी याची झलक प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. गाण्यांच्या ओळींवरून हे पंजाबी गाणं असल्याचं समाजतय. त्यासोबतच जीन्स टॉप आणि स्टायलिश ज्वेलरी असा त्यांचा आगळावेगळा लूक पहिल्यांदाच समोर आला आहे.