मुंबई – बॉलिवूडचा दबंग ‘सलमान खान’ने 27 डिसेंबरला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे. सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एक दिवस आधीच सुरू झाले होते. सलमानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये त्याचे अनेक जवळचे मित्र आणि बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. दरम्यान, वाढदिवसानिमित्त आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी सलमानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर फॅन्सची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
यावेळी त्याने घराच्या बाल्कनीत उभे राहून चाहत्यांना आपला चेहरा दाखवला आणि कृतज्ञता व्यक्त केली. सलमानने वडील सलीम खान हे देखील यावेळी चाहत्यांचे स्वागत करत होते. वेगवेगळ्या शहरातील चाहत्यांनी सलमानच्या निवासस्थानी सकाळपासूनच अभिनेत्याला खास पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी मिठाई, टी-शर्ट, सलमानचे मोठे पोस्टर्सही सोबत आणले होते. यावेळी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर तुंबड गर्दी केली होती. ही गर्दी इतकी वाढली की नंतर पोलिसांना त्यावर लाठीचार्ज देखील करावा लागला होता.
दरम्यान, एवढ्या गर्दीत प्रत्येक चाहत्याला सलमानची भेट घेणं शक्य होत नाही. मात्र काही असे चाहते असतात, जे त्यांच्या कामामुळे सलमानचं लक्ष वेधून घेतात. अशाच एका चाहत्याने सलमानचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या महिन्याभरापासून विविध राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. अशा थंडीत सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक चाहता जबलपूर शहरातून चक्क सायकल चालवत मुंबईतील सलमाच्या निवास्थानी दाखल झाला.
View this post on Instagram
त्याला जबलपूरहून मुंबईला सायकलवर यायला पाच दिवस लागले आहेत. त्याच्या सायकलवर ‘बीईंग ह्युमन’ हे सलमानच्या संस्थेचं नाव लिहिलं आहे. त्याने आपल्या सायकलवर एक पोस्टरसुद्धा लावला आहे. ‘चलो उनको दुआएं देते चलें..’ असं त्यावर लिहिलं आहे. दरम्यान, जबलपूरहून सायकल चालवत आलेल्या या चाहत्याची खास भेट सलमानने घेतली. त्याच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केले आहे. अभिनेता सलमान खानचे देशभरात लाखो चाहते असून, हे सर्वच जण आपल्या लाडक्या अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात.